HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज्यातील नवनिर्वाचित २८८ पैकी २८२ आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई | राज्यात बुहमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज (२७ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता विधीमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवण्यात आले. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी  २८८ पैकी २८२ नवनिर्वाचित आमदरांना शपथ दिली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली.

यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या विधानसभेच्या दारावरच सर्व आमदारांचे स्वागत केले. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाऊ अजित पवार यांचेही त्यांनी मिठी मारून स्वागत केले. यादोघांची बहिण भावांची गळाभेट राज्यासाठी लक्षवेधी ठरली.  निवडणूक लढविणारा ठाकरे पहिला आदित्य ठाकरे यांनी आज शपथ घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे अवघ्या ४ दिवसांचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने काल (२६ नोव्हेंबर) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केला आहे. यानंतर महाविकासआघाडीने राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.

फडणवीस-पवारांनी शपथविधीनंतर राजकीय भूकंप

देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री पदा तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप राज्यासह देशात राजकारणात मोठा भूकंप झाला. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार एक-एक करून परतू लागले आणि बहुमताचे आकडे जुळवण्यात भाजपसमोरील अडचणी वाढू लागल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालाय आज बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला.

Related posts

सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं

News Desk

मुंबईत गणेश विसर्जनासाठी आता ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

News Desk

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

अपर्णा गोतपागर