HW News Marathi
महाराष्ट्र

जागतिक महिला दिनी मतदार जागृती मेळावे घ्या – राज्य शासन

भोकर विधानसभा मतदार संघात ८ मार्च रोजी महिला मेळाव्यांचे आयोजन

उत्तम बाबळे

भोकर : – राज्यातील एकुण मतदार संख्या पाहता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण किमान १० ते कमाल ३५ टक्के पर्यंत घटले असल्यामुळे महिला मतदारांची मतदार यादीतील नावे व प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील संख्या प्रमाण वाढविण्यासाठी महिला जागृती अभियान राबविले जात असून सबंध राज्यात जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावेत असे राज्य शासनाने आदेश पारित केले आहेत.

याच अनुषंगाने ८५ – भोकर विधानसभा मतदार संघात वार्ड,गाव व तालुकास्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात अाल्याची माहीती भोकर विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी दिली आहे. राज्यातील सन २०१६ ची १२,१३६२,०९२ (१२.१३ कोटी ) लोकसंख्या पाहता व सन २०११ च्या जनगणनेनूसार पुरुष जनन संख्येच्या तुलनेत महिलांचे सरासरी जनन प्रमाण १,००० पुरुषांमागे ९२५ महिला ८२.९ टक्के असे आहे.तर कांही जिल्ह्यात यापेक्षा ही कमी टक्केवारी आहे.जसे नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३३,५६,५६६ यात १७,३२,५६७ पुरुष व १६,२३,९९९ स्त्रीया अशी असून १६.७० टक्के असा फरक निदर्शनास येतो.ग्रामीण भागात १००० पुरुषांच्या तुलनेत ९४५ महिला व शहरी भागात ९३७ असे जनन प्रमाण आहे.मुळातच महिला संख्या प्रमाणात मोठी तफावत आणि त्यातल्या त्यात मतदार नोंदणीही कमी प्रमाणातच होते. राज्यात झालेल्या विविध निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी होत असल्याचे व प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत ही किमान १० व कमाल ३५ टक्के महिला मतदान घटल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे राज्य शासन व राज्य निवडणुक आयोगाने महिला मतदार संख्या वाढविण्याच्या उद्देशाने दि.२० ते २८ फेब्रुवारी २०१७ दरम्यान महिला मतदार जागृती व नोंदणी अभियान राबविले आहे.असेच अभियान ८५ – भोकर विधानसभा मतदार संघातही राबविण्यात आले आहे.या अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात ६ मार्च रोजी वार्ड,गाव व तालुकास्तरावर यादीत नाव न नोंदविलेल्या सर्व महिला मतदारांचे नमुना ६ किंवा नमुना ८ अ बीएलओ मार्फत नोंदवून घेऊन ते त्या त्या तालुका तहसिल कार्यालयातील निवडणुक विभागात जमा करावयाचे आहेत.या अभियानाची विस्तृत माहिती महिलांना मिळावी म्हणुन जागतीक महिला दिना निमित्य महिला मेळावे घ्यावेत व महिलांत जागृती करावी असे आदेश राज्य शासनाने महसूल विभागास दिले आहेत. याच अनुषंगाने राज्यासह ८५ – भोकर विधानसभा मतदार संघात जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी वार्ड,गाव व तालुकास्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी झालेल्या महिलांना मतदार ओळखपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती भोकर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,सहा.म.नो.अ.तथा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली असून या मेळाव्यास बहुसंख्येने महिला भगिणींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का? भाजपचा सवाल

News Desk

कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

जाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त

News Desk