HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट

सांगली | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

बावनकुळे हे संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होते. यावेळी आज (13 नोव्हेंबर)  सायंकाळी 5.00 वा. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यापूर्वी भिडेंनी बावनकुळे यांचे शाल व श्रीफळ देत स्वागत केले.

भेटीनंतर  बावनकुळे यांनी संभाजी भिडेंच्या  साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहरअध्यक्ष दीपकबाबा शिंदे , प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही!

News Desk

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही !

News Desk

राज्यात काल 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk