HW News Marathi
महाराष्ट्र

देशभरात गेल्या २४ तासांत ३२,९३७ नवे करोनाबाधित, सर्वाधिक केरळमधून!

मुंबई। देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आरोग्यमंत्रालय वेळोवेळी याबद्दलची माहिती देत आहे. रुग्णसंख्येत होणारी घट ही देशवासीयांसाठी दिलासादायक बाब असली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

देशात गेल्या २४ तासात ३२ हजार ९३७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी १८ हजार ५८२ रुग्ण केरळ राज्यातील असून ४,७९७ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.८१ लाखांच्या खाली आली आहे.

कोरोनामुळे जग बंद करणार का

मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेचे आज शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पत्रकांराशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक आजारा सोबत जगतोय ,कोरोनामुळे जग बंद करणार का ? असा सवाल केला पूढे बोलताना त्यांनी युद्ध पातळीवर लसीकरण पूर्ण केलं पाहिजे ,लसिंचे दोन डोस बंधनकारक करता तर लसीकरण ही जबाबदरी सरकारची आहे असा टोला लगावला

भाजप युतीची चर्चा सुरू आहे

मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या उदघाटन प्रसंगी भाजपचे आमदार रवींद्र चव्हान यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चाना उधाण आले .गेल्या काही महिन्यपासून मनसे भाजप युती ची चर्चा सुरू आहे. यावर मनसे भाजपचे ज्येष्ठ नेते काही वक्तव्य करत नसले तरी मनसे भाजपची वाढलेली जवळीक युतीचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंनी आदेशाप्रमाणे निर्णय होईल असं सांगत विषयाला बगल दिली तर आम्ही निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर कार्यलयाचे उदघाटन केलंय आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचे स्पष्ट केलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी आता संजय राऊतांवर पुस्तकचं लिहिणार!’ चंद्रकांत पाटलांकडुन खिल्ली

Arati More

युतीबाबत आम्ही आशावादी, शिवसेना-भाजप नैसर्गिक मित्र आहोत !

News Desk

भाजप नेत्या चित्रा वाघ याचं राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र!

News Desk