मुंबई | कोरोनाशी राज्य आणि केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यशस्वी लढा देत आहेत. महाराष्ट्रात १९६ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण आनंदाची बाब म्हणजे त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.
सक्रिय प्रकरणे – 155#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक— Rajesh Tope (@rajeshtope11) March 29, 2020
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत निगेटिव्हपणे वाढत असतानाच, ही ‘पॉझिटिव्ह’ बातमी आली आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देत राज्यातील ३४ रुग्ण घरी परतले आहेत. दरम्यान, कोणत्या शहरात, जिल्ह्यात किती कोरोनाबाधित रुग्ण आहेत याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मुंबई व ठाणे परिसरात १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १,औरंगाबाद १ ,यवतमाळ ३ , मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १ , जळगाव १ आणि बुलडाण्यात १ असे एकूण १९६ रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 196, In detail, Mumbai & Thane Region 107, Pune 37, Nagpur 13, Ahmednagar 03, Ratnagiri 01, Aurangabad 01,Yavatmal 03,Miraj 25, Satara 02,Sindhudurg 01, Kolhapur 01,Jalgaon 01, Buldhana 01, such is the count.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 29, 2020
या रुग्णांपैकी मुंबईतील १४, पुण्यातील १५, नागपूर १ , औरंगाबाद १, यवतमाळ ३ अशा एकूण ३४ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच सक्रिय प्रकरणे ही १५५ असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आजचा (२९ मार्च) सकाळी 9 वा. पर्यंतचा हॉस्पिटलनिहाय तपशीलही त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा दिनांक 29 मार्च 2020 सकाळी 9 वा. पर्यंतचा हॉस्पिटलनिहाय तपशील#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/f7PrdqfjuJ
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.