HW News Marathi
Covid-19

महाविकासआघाडीचा ३६० डिग्री अनुभव महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेल!

सत्यजित तांबे | देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करणे योग्य ठरणार नाही. कोणते सरकार कोरोनासारख्या महामारी परिस्थिती हातळण्यात किती सक्षम आहे आणि नाही, हे सांगण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरणार नाही. मी तुम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो, ‘ए’ आणि ‘बी’ हे दोघे जण एकत्र लढाई लढले आणि त्यांना लढाईत त्यांनी यश देखील मिळाले. मात्र, दुदैवाची गोष्ट म्हणजे या लढाईचे नेतृत्व करणारे नेते हे सत्तेचे भुकेलेले आणि स्वार्थी आहेत. विजय मिळवूनही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला लढाईदरम्यान दिलेले आश्वासनांचे पालन केले नाही. तर दुसऱ्या बाजूला ‘सी’ आणि ‘डी’ यांना देखील लढाई जिंकता आली नसली तरी त्यांना यश मिळाले होते. त्या दोघांनी त्यांचा स्वीकार देखील केला. मग ‘बी’ला राज्यातील पक्षाचे आणि जनतेचे हित अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे अनपेक्षितपणे ‘बी’ने, ‘सी’, आणि ‘डी’ यांच्यासोबत येऊन या तिघांनी एकत्र एक नवीन समीकरण तयार केले.

तेव्हा मोदी सरकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीमध्ये व्यस्त होते !

तुम्हाला जर मी ए, बी, सी आणि डी हे कोण आणि कोणाबद्दल बोलत आहे हे कळाले नसेल तर मी तुम्हाला सांगतो की मी, राज्यातील महाविकासआघाडी सरकारबद्दल बोलत आहेत. हे तुम्ही आधी समजून घेणे आणि माहिती करून घेणे आवश्यक आहे की, सध्या आपण ज्या परिस्थितीत जगतो आहे ते अपूर्व आणि अभूतपूर्व असेल परंतु निश्चितच हे सर्व खर आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीला कोविड – १९ मधील देशासाठी धोका असल्याचे ते म्हटले होते. मात्र, काल्पनिक आणि केवळ जनसंपर्क चालविणारे सरकार भारतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीमध्ये व्यस्त होते. विरोधकांनी आता परदेशातून आलेल्या अतिथींचा मनोरंजन करणाऱ्या सत्ताधारी सरकारला येणाऱ्या आपत्तीची ओळख पटवून द्यावी आणि लहान राष्ट्रांप्रमाणे (श्रीलंका) आपल्याही देशाला या महामारीसाठी तयार करायला हवे.

देवेंद्र फडणवीस फक्त या परिस्थितीचे राजकारण करतायत !

सध्याची परिस्थिती हाताळण्यास तर्कशास्त्र, माहिती-तंत्रज्ञान, ज्ञान हे देखील अपयशी ठरले आहेत. तरी देशात कॉंग्रेस चालविणाऱ्या राज्यातील चुकांची माहिती देऊन भाजप अजूनही राजकारण करत आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव हातळण्यास महाविकासआघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे. मात्र, यावेळी भाजपने वस्तुस्थिती आणि सर्वसाधारण स्पष्टीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र देशातील महसूल, भौगोलिक आणि लोकसंख्याच्या दृष्टीने मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक कामासाठी येतात. मुंबईही देखील त्यांना काम देते आणि यातून ते सन्मानपूर्वी जीवन जगत आहेत. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे राज्यात सर्वात मोठी झोपडपट्टी सुद्धा आहे. यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते या परिस्थितीही राजकारण करत आहेत. फडणवीस हे सतत माध्यमांमध्ये सरकारची बदनामी करण्याचे काम करत आहेत. फडणवीस यांनी केंद्रकाडून राज्याला मिळालेल्या मदती माहिती दिली. विरोध पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या माधमांतून राज्याच्या परिस्थिती जनतेसाठी महत्वाची भूमिका बजावायला हवी, पण हे सर्व सत्यात उतरणे अशक्य असल्याचे सध्या दिसत आहे.

वैद्यकीयविषयक वस्तूंचे वितरण आणि निधी उपलब्ध करण्यात केंद्र अपयशी !

पीपीई किट आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी निधी आणि वितरण करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. कोविडमुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, हे सत्य आहे. पण तरही गुजरात तुलनेत राज्यातील मृत्यूदर कमी आहे. महाविकासआघाडी सरकारचे प्रत्येक नेते एकत्र येवून आपआपल्या ताकदीने कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नेते सातत्याने राज्यातील जनतेशी नियमितपण संवाद साधत राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत योग्य, सत्य आणि रुग्णांच्या आकडेवारीची सर्व माहिती देत आहेत.

महाराष्ट्राला दुर्दैवाने या बिकट स्थितीचा एकट्याने सामना करावा लागतोय !

स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने बसची व्यवस्था केली होती. मात्र, भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातील सरकारने काँग्रेस सरकार असलेल्या महाराष्ट्र, राज्यस्थान, छत्तीसगढ या राज्यांमधून आलेल्या स्थलांतरित मजुरांसाठीच्या बसेसच्या मुद्द्यावरून काही आठवड्यांपासून केवळ उपद्रव निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. आता देशांतर्गत बनविण्यात आलेल्या पीपीई किट, पारदर्शक व उच्च चाचणी व परिपूर्ण व्यवस्थापन असून देशातील एक इतके मोठे असलेले हे राज्य दुर्दैवाने एकट्याने चालत आहे आणि केंद्र सरकारही महाराष्ट्र सहकार्य करण्यासंदर्भात कोणताही रस दाखवित आहे. खरंतर आज विरोधकांना राजकारण करण्यात रस नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टात सादर

News Desk

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk