मुंबई । कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२२ जून) दिली.
राज्यात आज 3721कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 135796 अशी झाली आहे. आज नवीन 1962 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 67706रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 61793 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 22, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१, उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.