HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील ३९ रुग्णांना डिस्चार्ज, तर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर

मुंबई | राज्यात कोरोनाचे आज १७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आता एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे तर आज (३० मार्च) 2 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३० मार्च) दिली.

आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर कोरोना बाधित असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे.

एकूण २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले

याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही. राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई १४, पुणे ७, पिंपरी चिंचवड ९, यवतमाळ ३, अहमदनगर १, नागपूर ४, औरंगाबाद १, नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

राज्यातील पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांची माहिती

  • मुंबई – ९२
  • पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – ४३
  • सांगली – २५
  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा – २३
  • नागपूर – १६
  • यवतमाळ – ४
  • अहमदनगर – ५
  • सातारा – २
  • कोल्हापूर – २
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी -१
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • जळगाव – १
  • बुलढाणा – १
  • नाशिक – १
  • इतर राज्य – गुजरात – १

एकूण – २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर

News Desk

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

Aprna

पॉंडिचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत ठरले अपयशी

News Desk