HW News Marathi
Covid-19

पुण्यातील कोरोनाला रोखण्यासाठी ४ आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती

पुणे | पुण्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ४ आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान यापूर्वी सहकार आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, साखर आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्‍यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

माने यांच्याकडे कोरोना टेस्टिंग लॅब नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. सरकारी आणि खासगी मान्यताप्राप्त लॅबचा यामध्ये समावेश आहे. लॅबमध्ये टेस्टची संख्या वाढवणे, लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्यावर भर, टेस्टचा निर्णय कळण्याचा कालावधी कमी करणे अशा विविध जबाबदाऱ्यांचा यात समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुण्यात लॉकडाऊन करा”, मुंबई उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना सूचना!

News Desk

पुणेकरांनो थोडी कळ सोसा, वडेट्टीवारांचा सल्ला!

News Desk

“लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय ??”

News Desk