HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : बुलढाण्यात ४ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्याची संख्या २१ वर

बुलढाणा | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. तासागणिक बाधितांची संख्या ही वाढतच आहे. बुलढाण्यात आज (१४ एप्रिल) ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामूळे बुलढाण्यातील कोरोनाबाधितांची संखअया ही २१ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात या आधी पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या संपक्रातील ४ जणांना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली. लोकांमध्ये सध्या आणखीनच भीतीचे वातावरण पसरले आहे. आत्तापर्यत बुलढाण्यात कोरोनामूळे एकाचा मृत्यूही झाला आहे.

देशात लॉकडाऊन हा ३ मेपर्यत वाढवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यत ल़ॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला होता. त्यामूळे महाराष्ट्रातील लॉकडऊनही ३ दिवस आणखी वाढला आहे. या दरम्यान, सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Belgaum Election | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा २९०३ मतांनी पराभव

News Desk

“एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात!”, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

News Desk

‘सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलं?’, फडणवीसांचा सवाल

News Desk