HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज

मुंबई । दुष्काळग्रस्त भागीतल १२ जिल्ह्यांसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने ८ हजार ०२२ चालक आणि वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यातून जवळपास ४२ हजार अर्ज आले आहेत. या अर्जाचा अकडा पाहता कळते की, महाराष्ट्रातील बेरोजगारीची परिस्थिती अधिक बिकट आहे.
तसेच महिला उमेदवारांसाठी असलेल्या २ हजार ४०६ जागांसाठी केवळ ९३२ ऐवढेच अर्ज आले आहेत. दोन जागांसाठी एकहून कमी अर्ज प्राप्त झाला आहे. तर अनुसूचित जमातीच्या ६८५ जागांसाठी मात्र २ हजार ४०६ अर्ज आले आहेत. महिलांचा प्रतिसाद अल्प असला पहायला मिळाला आहे. एसटी महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी २,४०६ अर्ज दाखल झाल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
तसेच भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १०० गुणांची ५० प्रश्नांची लेखी परीक्षा रविवारी (२४ फेब्रुवारी) सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होईल. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारे प्रवेश पत्र व परीक्षा केंद्राची माहिती एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. महामंडळ याबाबतची सूचना उमेदवारांना मोबाइलवर मेसेज व त्यांनी दिलेल्या ई-मेलवर देईल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकांचे दुःख सतावत असल्यामुळे महाराष्ट्र बंदचा कांगावा, पडळकरांची राज्य सरकारवर टीका!

News Desk

… आणि बैठकीत तात्काळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे धनंजय मुंडेंनी दिले निर्देश

News Desk

बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

News Desk