HW News Marathi
महाराष्ट्र

… आणि बैठकीत तात्काळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे धनंजय मुंडेंनी दिले निर्देश

बीड | बीड जिल्हा नियोजन समितीला कोणतीही माहिती न देता उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा नियोजन समितीने दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याबाबत यंत्रणेला सूचित केलं आहे .

बीड जिल्हा नियोजन समितीची काल (२ फेब्रुवारी) बैठक होती. या बैठकीत शहरातील विकास कामे व सुरू असलेल्या योजनांची माहिती देणे अपेक्षित असताना माहिती न देणाऱ्या बीड नगर परिषद मुख्यधिकारी डॉ. उत्कर्ष गुटे यांना सभागृहाच्या बाहेर हाकलण्यात आले. तसंच यावेळी धनंजय मुंडे संतापले आणि जिल्ह्याधिकारी यांना मुख्यधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव घेत कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk

महापौरांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शेलारांना जामीन मंजूर

News Desk

ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या, छगन भुजबळांनी केली टीका

News Desk