HW News Marathi
Covid-19

आज धारावीत ४६ नवे कोरोना रुग्णांची नोंद, तर एकूण संख्या ९६२ पोहोचली

मुंबई | मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. धारावीत आज (१२ मे) ४६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीतील करोनाबाधितांची एकूण संख्या ९६२ झाली असून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१ झाली आहे.

धारावीत ६० फूटी रोड, नाईक नगर, कुंभारवाडा, काळा किल्ला, पीव्ही चाळ आणि न्यू म्युनिसिपल चाळीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कुट्टुवाडी आणि ट्रान्झिस्ट कँम्प येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. धारावी मेन रोड, इंदिरा कुरेशी नगर आमि राजीव गांधी नगरमध्ये प्रत्येकी तीन तर टी-जंक्शन येथे पाच रुग्ण सापडले आहेत. ९० फूटी रोड आणि धारावी क्रॉस रोड येथे प्रत्येकी ७ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले आहेत.

राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याच्या नावावर झाली असून आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचे काम होत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत १५ जुलैपर्यंत संचारबंदी लागू 

News Desk

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ५३,६०१ नवे रुग्ण !

News Desk