HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

मुंबई । राज्यात गेल्या २४ तासात ३ हजार ९५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच एका दिवसात तब्बल ६ हजार ४७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाने आज (७ नोव्हेंबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा दुप्पट आहे.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट हा ९१.५३% इतका झाला आहे. तर राज्यात आज कोरोनामुळे १५० जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत करण्यात आलेल्या एकूण ९३ लाख ७८ हजार ५३१ प्रयोगशाळा चाचण्यांपैकी १७ लाख १४ हजार २७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण कोरोनाचे ९९ हजार १५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! मुंबईत १ हजार ८३७ कोरोना रुणांची नोंद, तर ११ जणांचा मृत्यू

Aprna

आनंदाची बातमी! संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत दिली जाणार – डॉ.हर्षवर्धन

News Desk

दिल्लीत काय सुरु राहणार, काय बंद राहणार?

News Desk