HW News Marathi
महाराष्ट्र

४६६ नवीन रुग्णांचे निदान, राज्यातील एकूण कोरोना बांधितांची संख्या ४६६६ वर पोहोचली

मुंबई। राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात आज (२० एप्रिल) एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई – ३०३२ (१३९)

ठाणे – २० (२)

ठाणे मनपा – १३४ (२)

नवी मुंबई मनपा – ८३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा – ८४ (२)

उल्हासनगर मनपा – १

भिवंडी निजामपूर मनपा – ३

मीरा भाईंदर मनपा – ७८ (२)

पालघर – १७ (१)

वसई विरार मनपा – १०७ (३)

रायगड – १५

पनवेल मनपा – ३३ (१)

ठाणे मंडळ एकूण – ३६०७ (१५५)

नाशिक – ४

नाशिक मनपा – ६

मालेगाव मनपा – ८५ (८)

अहमदनगर – २१ (२)

अहमदनगर मनपा – ८

धुळे – १ (१)

जळगाव – १

जळगाव मनपा – २ (१)

नंदूरबार – १

नाशिक मंडळ एकूण – १२९ (१२)

पुणे – १८ (१)

पुणे मनपा – ५९४ (४९)

पिंपरी चिंचवड मनपा – ५१ (१)

सोलापूर मनपा – २१ (२)

सातारा – १३ (२)

पुणे मंडळ एकूण – ६९७ (५५)

कोल्हापूर – ५

कोल्हापूर मनपा – ३

सांगली – २६

सांगली मिरज कुपवाड मनपा – १

सिंधुदुर्ग – १

रत्नागिरी – ७ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण – ४३ (१)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा – २९ (३)

जालना – १

हिंगोली – १

परभणी मनपा – १

औरंगाबाद मंडळ एकूण – ३३ (३)

लातूर – ८

उस्मानाबाद – ३

बीड – १

लातूर मंडळ एकूण – १२

अकोला – ७ (१)

अकोला मनपा – ९

अमरावती मनपा – ६ (१)

यवतमाळ – १५

बुलढाणा – २१ (१)

वाशिम – १

अकोला मंडळ एकूण – ४९ (३)

नागपूर – ३

नागपूर मनपा- ६७ (१)

गोंदिया – १

चंद्रपूर मनपा – २

नागपूर मंडळ एकूण – ७३ (१)

इतर राज्ये – १३ (२)

एकूण – ४६६६ (२३२)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा दिनानिमित्त रमेश देव, लता मंगेशकरांना अनोखी स्वरवंदना

News Desk

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवला तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू | बाळासाहेब थोरात

News Desk