रायगड | महाड शहरात आज (२४ ऑगस्ट) ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. इमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Today at about 1850 hrs, A G+4 building collapsed in Kajalpura area of Mahad Tehsil in Dist. Raigad, Maharashtra.
About 50 people are feared to be trapped. 3 teams of 5 BN NDRF have moved: National Disaster Response Force (NDRF) pic.twitter.com/XlWegCSHqq— ANI (@ANI) August 24, 2020
इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे. अशी माहिती काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी दिली आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.