HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे शाळा उघडणार की नाही प्रश्नचिन्हच?

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच थैमान सुरू होतं. यामुळे राज्यातील सगळ्याच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र हळूहळू कोरोनातून सावरत असताना परिस्थिती पूर्वपदावर येत होती. म्हणूनच राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एका व्हेरिएंटने

चिंता वाढवली. म्हणून आता शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार पुन्हा काय निर्णय घेणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार

आज (29 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित असतील. यावेळी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट व्यतिरिक्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या चिंतेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता सरकार शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर ठाम राहणार की शाळा बंदच राहणार आहे यावर आज निर्णय होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलय..

मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसारच आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केलेला नाही. त्यामुळे राज्यातील शाळाही तयारीला लागल्या होत्या. इतकंच नाही तर आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. त्यामुळे, आता सरकार या नवीन विषाणूमुळे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच आणि पालक सोबतच विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : देशातील ८० टक्के कोरोनाबाधितांमध्ये लक्षणचे नाहीत ! कोरोनाच्या या प्रकाराबद्दल जाणून घ्या …

News Desk

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ यांना दिलासा

News Desk

राम मंदिराच्या पायभरणीचा सोहळा दिवाळीसारखा साजरा करावा मात्र कोरोनाचे भान ठेवावे – चंद्रकांत पाटील

News Desk