HW News Marathi
महाराष्ट्र

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर तालुक्यातील दिवशी (बु) येथील अल्पभूधारक शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे (३५) यांचे किनी येथे पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरताना २९ जुलै रोजी मृत्यू झाला. या घटनेचा राज्यभर पडसाद उमटल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुबिंयांना तातडीने मदतीची घोषणा केली. गुरुवारी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित रकमेचा धनादेश रामा पोतरेंच्या कुटुबिंयांना सुपूर्द केला. रामा लक्ष्मण पोतरे पीक विमा भरण्यासाठी एस.बी.आय.बँक शाखा किनी येथे सतत ३ दिवस रांगेत उभा राहिल्याने २९ जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. रामा पोतरे हे घरातील एकमेव कर्ता पुरूष होते. पीक विमा भरण्याच्या चुकीच्या नियोजनाचे ते बळी ठरल्याने या यंत्रणेतील दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली होती. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबळे,केरबाजी देवकांबळे, माधव वाघमारे कुष्णूरकर, गणपत सुर्वेस्कर, गंगाधर जोगेकर यांनी या प्रश्नी आवाज उठवला होता. त्यामुळे शासन, प्रशासन, विविध राजकिय नेते, पदाधिकारी आदी यंत्रणा हालली. दरम्यान, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी भोकर येथे भेट दिली. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी या घटनेविषयी मुख्य्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्याशी चर्चा केली. तसेच विधान सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना याचा जाब विचारला आणि तात्काळ सहाय्यता निधी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मयत पोतरेंच्या कुटूंबीयांना ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येतील अशी घोषणा ३० जुलै रोजी केली होती. मयत शेतकरी रामा पोतरेंच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस व प्रशासनाने कारवाई करुन पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्फत राज्य शासनाकडे पाठविला. यावरून घोषीत केलेली रक्कम शासनाने त्वरीत पाठविली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तो ५ लाख रुपयाचा धनादेश मयत रामा पोतरे यांचे वडील लक्ष्मण पोतरे, आई सावित्रीबाई पोतरे, पत्नी सुनिता पोतरे, नऊ वर्षाचे आवळे-जावळे मुलगा चि. गौरव व मुलगी कु. गंगोत्री, यांना त्यांच्या घरी दि.११ ऑगस्ट रोजी प्रशासनाचे प्रतिनिधी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुपूर्द केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतीश देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपादक उत्तम बाबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सभापती जगदिश पाटील,संचालक रामचंद्र मुसळे, सरपंच राजू पाटील दिवशीकर, भाजपचे प्रदेश का. का. सदस्य प्रकाश पाटील कोंडलवार, ता. अध्यक्ष गणपत पिट्टेवाड, ता. सचिव बाळा साकळकर, जि. प. सदस्य दिवाकर रेड्डी,नंदू याकावार, गणपत जाधव, शे. अर्शद भाई, सामाजिक कार्यकर्ते शाहीर माधव वाघमारे, गंगाधर जोगेकर, केरबाजी देवकांबळे, गणपत सुर्वेस्कर, बालाजी वाघमारे यांसह मयताचे नातेवाईक,तहसीलचे कर्मचारी, पोलीस पाटील,गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आंचल गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं?’ संजय जाधवांनी केला खुलासा

News Desk

बीड जिल्हा कचेरीच्या आवारातील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

News Desk

शेरास सव्वाशेर ! अनिल देशमुखांच्या ‘गझली टोल्या’ला मुनगंटीवारांचं गंमतीदार प्रत्युत्तर

News Desk