HW News Marathi
महाराष्ट्र

ते पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात आले, नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन घेतली भेट

मुंबई | पारनेरच्या माजी आमदारांमुळे नाराज झालेल्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मोठा वादाचा प्रसंग उभा केला होता. यावरून गेले काही दिवस शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये तणाव होता. अखेर शरद पवार यांचे मातोश्रीवर जाणे, दुसऱ्याच दिवशी ठाकरे यांनी अजित पवारांशी चर्चा करणे या घडामोडींनंतर महाविकासआघाडीतील पेच सुटला आहे. आणि ते पाच नगरसेवक आज(८ जुलै) पुन्हा शिवबंधनात आले आहेत.

पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता. मात्र आता हे पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हरीण चाललं पंढरपूरला, विठूरायाच्या दर्शनाला

News Desk

CBSE १२ वीचा आज निकाल, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

News Desk

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk