HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, ५२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील ५२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आजच्या बैठकीनंतर ५२ नगरसेवकांचा भाजप प्रवेशाचा निर्णय झाला असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. नाईक पिता-पुत्रसह ५२ नगरसेवक शिवसेनेत प्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई महापालिकेत ५२ नगरसेवक आहेत. शिवाय ५ अपक्ष नगरसेवकांचा नाईकांना सुरुवातीपासून पाठिंबा आहे. हे सर्व नगरसेवक ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. यासाठी पारसिक हिलवर महापौर बंगल्यावर या गेट टूगेदर बैठकीचे आयोजन खुद्द महापौर जयवंत सुतार यांनी केले.

या बैठकीत नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे मुंबईतले नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या पाठोपाठ चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. येत्या ३० जुलै रोजी चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !

News Desk

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

News Desk

उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत आहे आम्हाला याची काही कल्पना नाही –  अनिल परब

News Desk