HW News Marathi
देश / विदेश

चिंताजनक ! मुंबईतील तब्बल ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. त्यातही मुंबई-पुण्यासारख्या शहरात कोरोनाची सर्वाधिक झळ बसत आहे. आता मुंबईला चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. मुंबईतील तब्बल ५३ पत्रकारांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बातमीनंतर आता मोठी खळबळ उडाली आहे. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ पत्रकारांची कोरोना टेस्ट केली होती. रविवारी या सर्व पत्रकारांच्या टेस्टचे रिपोर्ट्स आले. यावेळी १६७ पत्रकारांपैकी ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या ५३ जणांपैकी अनेकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. मात्र, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. कोरोनाची लागण झालेल्या या ५३ पत्रकारांमध्ये टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, प्रिंट फोटोग्राफर यांचा समावेश आहे.

पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने पत्रकारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व पत्रकारांना चांगले उपचार मिळतील याकडे आम्ही विशेष लक्ष देऊ, असे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, या १६७ पत्रकारांच्या कोरोना टेस्टनंतर आता मुंबईतील इतरही टेस्ट्स केल्या जाणार असल्याने कोरोनाबाधित पत्रकारांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कितीही बिकट परिस्थिती असली तरीही सर्वसामान्यांपर्यंत बातम्या पोहोचवणाऱ्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे आता सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : सीमेरेषवर दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचे भारताला पूर्ण अधिकार | यूएसएनए

News Desk

शबरीमाला प्रकरण हे संघ-भाजपचे मोठे कारस्थान !

Gauri Tilekar

सर्वोच्च न्यायालयाने नागेश्वर राव यांना दिली कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा

News Desk