HW News Marathi
Covid-19

रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ, रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसा आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात काल (२६ एप्रिल) एका रात्री ५५ रुग्ण आढळून आले. पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर पोहोचली आहे. ससूनमधील तीन जणांचा व मंगेशकर रुग्णालयामध्ये दोन अशा पाच जणांना आज ( २७ एप्रिल) मृत्यू झाला आहे.

पुण्यात काल जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२६४ वर पोहोचली होती, ही संख्या आता १३१९वर पोहोचली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचण्याच्या सुविधामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ झाल्याचे दिसून आल्याची आरोग्य विभगाचे म्हणणे आहे.

शहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४४ जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी सर्वाधिक २८ रुग्ण हे एकट्या ससून रुग्णालयातमध्ये दाखल आहेत. दरम्यान आणखी ६ कोरोनामुक्त रूग्णांना काल घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही १६५ झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ %, तर कोरोनाबाधितांचा आकडा २९, ४३५

News Desk

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला मोठा निर्णय

News Desk