HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात एका दिवसात ५५२ नवे कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४२०० वर पोहोचली

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ४२००वर पोहोचली आहे. राज्यात आज (१९ एप्रिल) दिवसभरात ५५२ कोरोनाग्रस्तांनची नोंद झाली आहे. यात पुण्यात ४९ कोरोना रुग्ण आढळून आले. तर मुंबई १३५ नवे रुग्ण आढळून आले. मुंबई आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यातील बळींचा आकडा २२३ वर पोहोचला आहे. तर फक्त मुंबई आतापर्यंत कोरोनामुळे १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी ६ जण मुंबई, मालेगाव ४, सोलापूर मनपा आणि अहमदनगर जामखेड येथील रुग्ण आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ४५६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ७२४ वर पोहोचला आहे. दरम्यान आज १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३ हजार ४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ३२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ हजार६४८ अशी झाली आहे. यापैकी 365 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

मालेगाव येथे मृत्यू झालेल्या चार रुग्णांना इतर काही आजार आहेत का याविषयी तपासणी सुरु आहे, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार २३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५०७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?’, फडणवीसांचा सवाल

News Desk

डोवालांवर आरोप करत देशमुखांचे ‘फेसबुक लाईव्ह’ रद्द, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार, हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास परवानगी !

News Desk