सातारा | शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला विधिवत पार पडेल असा विश्वास खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही याची सर्व शिवभक्तांना चिंता होती. मात्र, त्यांच्या या चिंतेचे निरसण झाले आहे. सर्व शिवभक्त गेली १४ वर्षे हा सोहळा राजवैभवात संपन्न करत आहोत. हा सोहळा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
यावर्षी देखील हा सोहळा वेगळ्या पद्धतीने करण्याचे मनात होते. मात्र, कोरोनामूळे सर्व परिस्थिती गंभीर असल्याने दरवर्षी प्रमाणे लाखोंच्या संख्येना शिवभक्तांना गडावर जाता येणार नाही आहे. दरम्यान, किती शिवभक्तांना गडावर जाता येईल याबाबत मख्यमंत्र्यांशी छत्रपती संभाजी राजे यांनी चर्चा केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करत दिली आहे.
तसेच, सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे, असा विश्वासही सर्व शिवभक्तांना छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे.
एकच धून 6 जून।
असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. pic.twitter.com/wlBzsde8fl
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.