HW News Marathi
Covid-19

महाशक्ती असोसिएशन व एस एम एस ग्रुप तर्फे गरजूंना अन्नदान,मदत लॅाकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार !

पुणे | औंधगाव पुणे येथील महाशक्ती जागतिक महिला लोकल्याण असोसिएशन तर्फे तसेच एस. एम .एस. ग्रुप च्या व श्री.आर.कोठारी यांच्या मदतीने कोरोना च्या लाॅकडाऊन च्या काळात १ में महाराष्ट्र दिनी जे महाराष्ट्रातील पुणे शहरातील औंध ते शिवाजी नगर पर्यंत च्या रस्त्यावरील फुले,फुगे,पिशव्या विकणारे तसेच दैनंदिन जीवनात रोजच्या हातावर पोट असलेल्या व आसरा नसणारे तसेच ज्या मुक्या प्राण्यांना अन्न वाटप करण्यात आले. हे लाॅकडाऊन संपेपर्यंत वाटप करण्यात येणार आहे ‌. हे वाटण्यामागे सामाजिक बांधिलकी व गरीब लोकांबद्दल आपुलकीची भावना आहे.

या कोरोना च्या काळात लाॅकडाऊन मध्ये अनेकाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. कारण ज्यांना बोलता न येणारे मुक पशु प्राणी तसेच ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या कडे व आसरा नसल्याने फिरणारे लोक ह्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते. त्यांना मदत केली जात नाही. त्यांना विचारणारे कोणी नाही.म्हणून त्यांना आपल्या परीने मदत व्हावी यासाठी १ में महाराष्ट्र दिनी अन्न वाटप करण्यात आले आहे असे महाशक्ती असोसिएशन च्या अध्यक्षा विनया सराफ. एस एम एस ग्रुप चे अध्यक्ष सोनल सराफ व या सामाजिक कार्याला मदत करणारे श्री. आर. कोठारी यांनी सांगितले आहे.हि मदत लाॅकडाऊन संपेपर्यंत करण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी

News Desk

सिरमची लवकरच लहान मुलांसाठी कोरोना लस होणार उपलब्ध!

News Desk

प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार – राजेश टोपे

News Desk