HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात एकूण चार टप्प्याच्या निवडणुकीत ६०.६८ टक्के मतदान

मुंबई | १७ व्या लोकसभा निवडणुकीचा आज (२३ मे) निकाल लागणार आहे. देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. देशातील ५४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तमिळनाडूमधील एका जागेवरील मतदान रद्द करण्यात आले आहे.तर महाराष्ट्रात ४८ जागांसाठी मतदान पार पडले आहे. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्यात एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ९८ इतक्या मतदारांपैकी ५ कोटी ३७ लाख ४१ हजार २०४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्या टप्प्यात ५५.७८ टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात मतदान पार पडले. ९१ मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. पहिल्या टप्प्यातले मतदान संपले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातल्या सात मतदारसंघात सरासरी ५५.७८ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. वर्ध्यात ५५.३६ टक्के मतदान झाले, रामटेक येथे ५१.७२ टक्के, नागपूर येथे ५३ टक्के, भंडारा गोंदिया येथे ६० टक्के, गडचिरोली ६१ टक्के, चंद्रपूर ५५.९७ टक्के, तर यवतमाळ-वाशिम येथे ५३.९७ टक्के मतदान झाले.

 

दुसऱ्या टप्प्यात ५७.२२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघामध्ये सरासरी ५७.२२ टक्के मतदान झाले आहे. नांदेडमध्ये सर्वांत जास्त ६०.८८ टक्के, त्यानंतर हिंगोलीमध्ये ६०.६९ टक्के, परभणीत ५८.५० टक्के, लातूर ५७.९४ टक्के, बीड ५८.४४ टक्के, उस्मानाबाद ५७.०४ टक्के, बुलढाणा ५७.०९ टक्के, अमरावती येथे ५५.४३ टक्के, अकोला येथे ५४,४५ आणि सोलापूर येथे ५१.९८ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात ५७.०१ टक्के मतदान

महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात एकूण ५७.०१ मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी कोल्हापुरात असून तिथे ६५.७० टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ हातकणंगले मतदारसंघात ६४.७९ टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी टक्केवारी पुण्यात नोंदविली गेली आहे. पुण्यात ४३.६३ टक्के मतदान झाले. औरंगाबादमध्ये ५८.५२ टक्के, बारामतीत ५५.८४ टक्के, माढ्यात ५६.४१ टक्के, साताऱ्यात ५५.४० टक्के, जळगावमध्ये ५२.२८ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 57 टक्के मतदान झाले. नंदुरबार ६७.६४ टक्के, धुळे ५७.२९ टक्के, दिंडोरी ६४.२४ टक्के, नाशिक ५५.४१ टक्के, पालघर ६४.०९ टक्के, भिवंडी ५३.६८ टक्के, कल्याण ४४.२७ टक्के, ठाणे ४९.९५ टक्के, मुंबई उत्तर ५९.३२ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम ५४.७१ टक्के, मुंबई उत्तर पूर्व ५६.३१ टक्के, मुंबई उत्तर मध्य ५२.८४ टक्के, मुंबई दक्षिण मध्य ५५.३५ टक्के, मुंबई दक्षिण ५२.१५ टक्के, मावळ ५९.१२ टक्के, शिरुर ५९.५५ टक्के, शिर्डी ६६.४२ टक्के मतदान झाले आहे.

२०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच आहे. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले.

Related posts

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

News Desk

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

News Desk

येत्या २६ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करणार

Aprna