नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेसध्या देशात ४ हजार ६७ कोरोनाबाधित असून त्यात गेल्या २४ तासांत ६९३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ६९३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (६ एप्रिल) पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. देशातील ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
Number of #COVID19 deaths stand at 109, with 30 people succumbing to it yesterday. 63 per cent of the deaths have been reported among people over 60 years age, 30 per cent in age bracket of 40 to 60 years & 7 per cent victims were below 40 years age: Lav Aggrawal, Health Ministry https://t.co/fj6gx4QuDy
— ANI (@ANI) April 6, 2020
देशातील ४ हजार ६७ कोरोना रुग्णांपैकी २९१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी सांगितली. कोरोनाची लागण झालेल्यांच्या आकडेवारीत महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त आहे. देशातील ४ हजार ६७ रुग्णांपैकी ७६ टक्के पुरूष तर २४ टक्के महिला आहे. अशी माहिती केंद्र आरोग्य मंत्रलयाने सांगितली आहे. तसेच देशात कोरोनामुळे मृत पावलेलांचा आकडा १०० पार झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना धोका
देशात कोरोनामुळे मृत व्यक्तींच्या आकडेवारी पाहिल्यानंतर कळते की, ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचाय जीवाला धोका आसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक होते. त्या पाठोपाठ ३० टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातले तर ७ टक्के मृत्यू ४० पेक्षा कमी वयोगटातले आहेत. असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.