HW News Marathi
देश / विदेश

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पत्रकार प्रशांत कनोजियांच्या तात्काळ सुटकेचे आदेश

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्विट केल्यानंतर पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक करण्यात आली होती. या अटकेविरोधात प्रशांत यांची पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज (११ जून) सुनावणीदरम्यान न्यायालायने प्रशांत यांनी ट्विवट केल्याप्रकरणी अटक करणे अयोग्य असून त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणी न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारले आहे.

प्रशांत यांच्या पत्नींनी याचिकेत म्हटले की, दिल्लीतील घरी साध्या वेशातील काही लोक आले आणि त्यांनी कुठलेही वॉरंट किंवा दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत न दाखवता प्रशांत यांना अटक केली आणि ट्रान्झिट रिमांड न घेता उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना जबरदस्तींने नेले, असे प्रशांतची पत्नी जिगीशा अरोरा यांनी याचिकेत म्हटले होते.

नेमके काय आहे प्रकरण

नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनोजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहे. ती महिला मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. कनोजिया यांनी हा व्हिडीओ शेअर करून योगी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत ७ जून रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतील निवासस्थानाहून कनोजिया यांना अटक करण्यात आली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या या सुचना?

News Desk

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

Arati More

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

swarit