HW News Marathi
महाराष्ट्र

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या ६५ वर्षांवरील कलाकारांना आता सेटवर काम करण्याची परवानगी

मुंबई | मनोरंजन क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या ६५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना दिलासा देणारी ही बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. हायकोर्टाने ठाकरे सरकारचा आदेश बाजूला ठेवत निर्णय दिला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांना शूटिंगची परवानगी नाकारली होती. मात्र, सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केले आहेत.

“६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील” असेही न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले. मिशन बिगीन अगेन’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत ६५ वर्षांवरील टीव्ही-चित्रपट कलाकार आणि क्रू मेंबर यांना सेट किंवा स्टुडिओमध्ये जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. या ठरावांना दोन्ही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला.

 

ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांना टीव्ही किंवा चित्रपट यामध्ये काम करता येत नव्हते. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा अशा व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार असल्याने कथानकात बदल करावा लागला होता. तर काही मालिकांमध्ये अशा कलाकारांचे सीन त्यांच्या घरुन शूट केले जात होते. अनेक कलाकारांनी या निर्णयाला विरोध केला होता. अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील ठाकरे सरकारला सुनावले होते.

“महाराष्ट्र सरकारने असा कायदा आणण्याआधी राजकारणातील ६० वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला विक्रम गोखले यांनी दिला होता.जर राज्य सरकारने कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. त्यामुळे ६५ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी”, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली होती.त्यामुळे आता ६५ वर्षांवरील कलाकारांना देखील सेटवर काम करण्याची परवानगी दिल्याने पुन्हा एकदा चित्रपट सृष्टी, सिनेसृष्टी नवे वळण घेईल यात शंकाच नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार! – विजय वडेट्टीवार

Aprna

संपापुढे सरकार झुकलं ,अल्पभूधारक शेतक-यांना कर्जमाफी

News Desk

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk