HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली | संपूर्ण देशात कोरोनाचा घट्ट विळखा आहे. देशात दिवसागणिक सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता १ लाख २५ हजार १०१ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत देशभरामध्ये तब्बल १३७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्याही आता ३, ७२० वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (२३ मे) याबाबतची अधिकृत आकडेवारी आणि माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशासाठी असलेली एक दिसालासदायक बाब म्हणजे देशातील कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा आता ५१,७८४ वर पोहोचला आहे. याचाच अर्थ देशातील कोरोनावर मात करण्याचा आकडा देखील वाढत आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट देखील ४०.९८% इतका आहे. तर सद्यस्थितीत देशात तब्बल ६६, ३३० कोरोनाबाधित हे देशभरातील विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत. आता देशातील राज्यांचा जर विचार केला तर अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा सध्या ४४,५८२ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १,५१७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत राज्यात १२,५८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related posts

रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक! विखे पाटील

Ramdas Pandewad

…यावरुन आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा

rasika shinde

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप सुरू !

News Desk