HW News Marathi
Covid-19

सातारा जिल्हयात ७ दिवसांचा कडक लॅाकडाऊन ! काय चालू काय बंद ?

सातारा | महाराष्ट्रात एकीकडे मुंबई पुण्यासारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय मात्र दुसरीकडे सातारा,सांगली या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागावर कोरोनाची पकड अधिक घट्ट होत चालली आहे. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. सातारा जिल्हयात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,4 मे ला सकाळी 7 वाजलेपासून 10 मे ला रात्री 12 पर्यंत कडक लॅाकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

लॅाकडाऊन काळात काय चालू काय बंद ?

1) सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. परंतु या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

2) कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

3) हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 63 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा !

News Desk

इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी थाळ्या वाजवण्याचे फालतू उपक्रम साजरे केले नाहीत, सेनेनं मोदी सरकारला सुनावलं

News Desk