HW News Marathi
Covid-19

मुंबईवरून थेट परळी गाठली त्यांच्यासोबत रडले !

बीड । राज्यासह बीड जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. काल (२१ एप्रिल) रात्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अंगरक्षक भावाला गमावले. गोविंद मुंडे असे त्यांचे नाव आहे. स्वतः पंकजा मुंडे यांनी गोविंद यांच्या सोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यानंतर आज (२२ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी थेट परळी गाठून आता गोविंद यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

पंकजा मुंडे यांनी यावेळी गोविंद यांच्या कुटुंबाला एक वचनही दिले आहे. “कुटुंबाला गोविंदच्या नसण्याची कुठलीही कमी भासू देणार नाही. दोन मुली आणि एक मुलगा यांना शिकून सवरून मोठं करून स्वतःच्या पायावर उभा राही पर्यंत माझी जबाबदारी… मुंबई वरून थेट कण्हेरवाडी (परळी) गाठली त्यांच्यासोबत रडले आणि धीरही दिला. लॉकडाऊन परिस्थितीमुळे परत घरी जात आहे पण सतत प्रयत्न चालू राहतील”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे ट्विटमध्ये काय म्हणाल्या ?

“माझा वाघ भाऊ हो ..माझा बॉडी गार्ड गोविंद या दुष्ट Corona ने टिपला….” माझ्या परिवारातील एका तरुण, मेहनती व धाडसी सदस्य माझा अंगरक्षक भाऊ गोविंद मुंडे कोविडनं गमावला आहे. कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. असे भावुक शब्दात पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आणखी एक भावुक पोस्ट केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हात जोडून निर्मला सीतारामण यांची सोनिया गांधींना विनंती

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक

News Desk

रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन आता राज्य सरकार खरेदी करणार

News Desk