HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus :  बारामतीत सातवा कोरोना पॉझिटिव्ह

बारामती | राज्यात कोरोनाबाधितंचा आकडा हा २००० च्या पलिकडे गेला आहे. तर दुसरीकडे बारामतीत सातवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. न्युमोनियाची चाचणी करण्यात आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी बारामतीत एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती त्याच परिसरात राहणारा हा रुग्ण आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामूळे बारामतीत एकाा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बातामतीत बारामती पॅटर्न सुरु करण्यात आले आहे. यात नागरिकांना घरपोच आवश्यक सेवा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणखी खबरदारीने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच, बारामतीकरांवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत!

News Desk

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन

News Desk

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk