HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेत आलो तर स्थानिकांना ७५ % आरक्षण देऊ !

सोलापूर | “आम्ही सत्तेत आलो तर स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देऊ. त्यासाठी कायदा देखील करू”, असे मोठे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. दरम्यान, यानंतर ते पत्रकारांशी संवाद बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना देखील एक आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस जर सत्तेत आली तर स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण दिले असून त्यासाठी कायदा करणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी थोडी समंजस भूमिका घ्यावी”, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्याचप्रमाणे “वंचितच्या नेत्यांनी आघाडीबाबत कोणतेही वक्तव्य केले असले तरी ते दुखावतील असे उत्तर आम्ही देणार नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यावे हाच आमचा प्रयत्न असेल”, असेही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna

अदानी-अंबानी यांना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा म्हणून कृषी विधेयकं मंजूर केली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

News Desk

जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये

News Desk