HW News Marathi
Covid-19

सरकारी रुग्णालयातील ८० % बेड हे कोरोना रुग्णांसाठी ठेवावे- टास्क फोर्सची मागणी

मुंबई | मुंबईत राज्याच्या दुप्पट कोरोनाची रुग्ण संख्या झाली आहे. रोज झपाट्याने कोरोनाचे रुग्ण  वाढत आहेत. दरम्यान, वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ८० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत अशी शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारकडे केली आहे. डॉ.संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची उभारणी करण्यात आली आहे.

मुंबईत सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून एकूण ३० हजार बेड आहेत. त्यातील ८० टक्के बेड म्हणजे २२ हजार हे फक्त कोविड रुग्णांसाठी ठेवावे अशी शिफारस करण्यात आली आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांच्या मते ६० टक्के बेड जरी कोरोना रुग्णांसाठी दिले तरी चालतील. त्यामुळे ६० ते ८० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी असावेत. तसेच यातील २० टक्के बेड अन्य रुग्णांना देण्याचे अधिकार हे सरकारकडे असावेत अशीही शिफारस केलेली आहे.

सध्या अनेक रुग्ण बेड मिळत नसल्याची तक्रार करतात त्यामुळे राज्य सरकारकडे बेड देण्याचे अधिकार असावेत, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे रुग्णालय ही पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, अशी माहिती टास्क फोर्सने दिली आहे . अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची शिफारस ही टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच आयुर्वेदिक टास्क फोर्स नेमण्याची ही शिफारस मुख्यमंत्र्यांना केली आहे. ही मागणी मान्य झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील रुग्ण संख्या ६१ लाखांच्या पुढे !

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

अजित पवारांनी शरद पवारांसमोर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळांचे तोंड भरून केले कौतुक

News Desk