HW News Marathi
Covid-19

राज्यात आज तब्बल ८११ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा ७ हजारच्या पार

मुंबई | राज्यात आज (२५ एप्रिल) तब्बल ८११ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,१२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३२३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १३, पुणे महानगरपालिका येथे ४ तर मालेगाव येथे १, पुणे ग्रामीणमध्ये १, पिंपरी चिंचवडमध्ये १, धुळे येथे १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये (५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ५०४९ (१९१)

ठाणे: ७१७ (१५)

पालघर: १३९ (४)

रायगड: ५६ (१)

मुंबई मंडळ एकूण: ५९६१ (२११)

नाशिक: १३१ (१२)

अहमदनगर: ३५ (२)

धुळे: २५ (३)

जळगाव: १३ (२)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: २१५ (२०)

पुणे: १०३० (७३)

सोलापूर: ४६ (४)

सातारा: २९ (२)

पुणे मंडळ एकूण: ११०५ (७९)

कोल्हापूर: १०

सांगली: २६ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद: ५० (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)

लातूर: ९

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: १

लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: २३ (१)

अमरावती: १९ (१)

यवतमाळ: २८

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ९२ (३)

नागपूर: १०७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ११० (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ७६२८ (३२३)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या लोकांनी लवकर दौरे करून अनेक नारळाची झाडे उभी केली, मला आनंद !

News Desk

कोरोनातून बरे झालेल्यांना आता TB संक्रमणाचा धोका..!

News Desk

मुंबई-पुण्यात ८ दिवसांत, तर राज्यात ‘सप्टेंबर’पासून कोरोना रुग्णसंख्या कमी होणार !

News Desk