HW News Marathi
Covid-19

जगभरात १० लाख लोकांना कोरोनाची लागण !

मुंबई | संपुर्ण जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरात आढळलेली पहिली कोरोना रूग्ण बरी झाली आहे. मात्र जगभरातल्या अनेक देशात या आजारामुळे हाहाःकार माजला आहे. सामान्य नागरिकांपासुन ते राजकारणी, अभिनेते, राजघराण्यातील लोकांपर्यंत कोरोना पोहोचला आहे.जगात आत्तापर्यंत मोठमोठ्या देशांमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे. अमेरिका ,स्पेन,इटली या देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

जगभरातील १० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ५३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेत सर्वात जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर सर्वात जास्त म्हणजे १३ हजारांपेक्षा जास्त मृत्यु इटली देशात झाले आहेत. स्पेनमध्ये सुद्धा १ लाखांहून अधिक लोकांना कोरोना झाला असून १० हजार लोकांचा मृत्यु झाला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

News Desk

लस निर्मितीसाठी मुंबईतील ‘हाफकिन’ सज्ज, केंद्राकडून ६५ कोटींचा निधी जाहीर

News Desk

खरीप हंगामासाठी १७ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता

News Desk