मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून आरेचं जंगल कुठे उभं राहणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मुंबईसारख्या महानगरात आता मध्यभागी जंगल उभं राहणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे ची ८१२ एकरची जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार २८६ हेक्टर अधिसुचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. त्यामुळे आरे मधली ही जमिन आता अधिकृतरित्या Indian Forest Act च्या सुरक्षेत आली आहे.
आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जमिनीचा ताबा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे सोपवला आहे. या जमिनीचा ताबा मिळाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात मध्यभागात जंगल निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील जागेत मेट्रो कारशेड बांधण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या काळात दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. यासंदर्भातील राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार असून त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेत असताना आदिवासी समाजाचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरेमधील जागेव्यतिरीक्त बोरिवली, गोरेगाव, मरोळ-मरोशी येथील जमिनीचा ताबाही वनविभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनीवर मुंबईत भविष्यकाळात जंगल फुलवलं जाऊ शकतं.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आज २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपविला.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.