HW News Marathi
महाराष्ट्र

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात ९ जणांची समिती करणार चौकशी

अमरावती | गेल्या काही दिवसांपासून दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील RFO दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.

सरकारवरचा वाढता दबाब लक्षात घेता आता, याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश यांनी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपास समिती नेमणयात आली आहे. या समितीमध्ये ९ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये वरिष्ठ IFS दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक एम के राव हे या समितीचे अध्यक्ष तर अमरावती मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नऊ जणांच्या समितीमध्ये सध्या चार महिला असून आणखी एका महिलेची NGO मधून नियुक्ती केली जाणार आहे.

कशी असेल समिती?

1- एम के राव प्रधान मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष.

2- विकास गुप्ता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर.

3- मीरा त्रिवेदी मुख्य महाव्यवस्थापक वन विकास महामंडळ नागपूर.

4- पियुषा जगताप विभागीय वन अधिकारी मेळघाट

5- श्रीमती ज्योती पवार सहाय्यक वनसंरक्षक,अमरावती

6- श्रीमती कोकाटे, RFO अमरावती.

7- किशोर मिस्त्रीकोटकर, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी.

8- प्रवीण चव्हाण मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती – सदस्य सचिव.

9 – एक सदस्य NGO मधून घेणार आहेत.

दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने वनविभागाने श्रीनिवास रेड्डी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विनोद शिव कुमार याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, तसेच श्रीनिवास रेड्डी यांनाही याप्रकरणी सह आरोपी करावं, अशी मागणी वनपाल वनरक्षक रेंज फॉरेस्ट ऑफिसर असोसिएशन व भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

काय लिहिले आहे दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये

प्रति रेड्डी साहेब

अपर प्रमुख सरंक्षक

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीसर ज्यावेळेस धुळघाट मधून माझी बदली हरिसालला झाली होती. तेव्हा मी खूप खुश होते. कारण माझ्यावर चौकशी सुरु असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. जेव्हा मला समजलं होतं की शीवकुमार सर मला DFO आहेत तेव्हा मला अजूनच आनंद झाला. सरांची काम करायची पद्धत मला आवडायची. ते माझ्याशी फार चांगले वागायचे. माझ्या रेंजची सर्व काम सगळ्यात आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे आमची रेंज पुढे जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली.

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे ३ गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात.

मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले.

जेव्हा गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अॅट्रोसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे.या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली आहे. अॅट्रोसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शीफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही.

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकच चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला आहेत.माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजूरांसमोर ते मला शिवीगाळ करतात. ते मला सहन होत नाही. त्यामुळे मी हे सांगत आहे. कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलवले. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही.

माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे. माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्याने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत आहे. त्यांचे अधिकाऱ्यांसोबतचे वागणे खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसरक्षक आहेत.

साहेब तुम्ही मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला. तुमचे मनापासून आभार. माझ्या आईला सुखरुप गावी पोचवायला मदत करा आणि विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झालं ते यापुढे इतर कोणासोबत होऊ नये.

दीपाली चव्हाण, RFO हरिसा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्वाभिमानी’तील वाद मिटला, राजू शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी दूर

News Desk

लाकडी कपाटाला प्लॅस्टिक खुर्ची टेकवून शरद पवारांची आमदार निलेश लंके यांच्या घरी बैठक!

News Desk

वाह रे ठाकरे सरकार ! एकीकडे एका बेडवर २-२ रुग्ण, तर दुसरीकडे हजारो बेड्स रिकामी !

News Desk