HW News Marathi
महाराष्ट्र

लाकडी कपाटाला प्लॅस्टिक खुर्ची टेकवून शरद पवारांची आमदार निलेश लंके यांच्या घरी बैठक!

अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. कोव्हिड काळात राज्यात सर्वात मोठं कोव्हिड सेंटर उभा करणारे आमदार म्हणून निलेश लंके हे नाव राज्यभर पसरलं होतं. आमदार लंके स्वत: कोव्हिड सेंटरमध्ये राहत होते. त्याच निलेश लंके यांच्या घरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली आणि लंके यांच्या आई वडिलांची पवारांनी विचारपूस केली.

लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र

आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.पवारांच्या बाजूला खाटवजा पलंगावर धनंजय मुंडे बसले, दुसऱ्या खुर्चीवर हसन मुश्रीफांनी बैठक मारली तर रोहित पवार आजूबाजूला जागा शोधत होते.

त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती

दरम्यान, आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं.शरद पवार हे लंकेच्या घरी दाखल झाले. त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं. पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते.

आमदाराची पत्नी असली तरी त्या इतर सामान्य कुटुंबातील महिलांप्रमाणेच घरकाम

लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर उभारलं होतं. त्यांनी या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची अहो रात्र सेवा केली. लंके यांचं लग्न झालं तेव्हा ते कंपनीत कामगार होते. तेव्हा कधीच वाटले नव्हते माझे पती आमदार होतील अशा भावना लंके यांच्या पत्नीने व्यक्त केल्या.लंके यांच्या पत्नी राणी लंके या त्यांच्या मामाचीच मुलगी आहेत. त्यादेखी सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. आमदाराची पत्नी असली तरी त्या इतर सामान्य कुटुंबातील महिलांप्रमाणेच घरकाम, कुटुंबाचा सांभाळ करतात. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा,नाष्टा, जेवण त्या बनवतात. इतकंच नाहीतर कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादी कामे त्या स्वतः करतात. जोडीला त्यांच्या जाऊबाई असतात. त्या त्यांची मोठी बहीणच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणाचा विषय सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

News Desk

महाराष्ट्र एकीकरण समिताच्या शुभम शेळकेंच्या मतपेटीत १ लाखांपेक्षा जास्त मतांची पडली भर 

News Desk

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल | खा. अशोक चव्हाण

Adil