HW Marathi
नाशिक महाराष्ट्र राजकारण

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोरोनामुळे स्थगिती…!

नाशिक |  यंदाच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या  ९४ व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालासुद्धा कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रात  करोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने सादित्य संमेलन होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. करोना स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. अखेर आज नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे.

यंदा नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीमध्ये   ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे हे संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याची माहिती दिली. “करोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असं महामंडळानं ठरविलं होतं. पण, नोव्हेंबर २०२०च्या मध्यापासून करोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये आटोक्यात आले आणि महाराष्ट्राने करोनावर मात केली असं चित्र निर्माण झालं. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचं जाहीर केलं होतं,” असं मडळानं म्हटलं आहे.

“संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना करोनानं पुन्हा डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने करोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, तो कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उलट प्रभाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती मंडळाने दिली आहे.

Related posts

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात

News Desk

“राजीव सातव यांचा ‘तो’ मेसेज माझ्यासाठी ठरला शेवटचा”, काँग्रेस नेता झाला भावूक

News Desk

संभाजीराजे,पवारांच्या जवळ जायचं असेल तर जा पण मराठा आरक्षणाचा विषय स्वत:साठी वापरू नका !

News Desk