HW News Marathi
महाराष्ट्र

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कारामुळे बीड जिल्हा हादरला

बीड | गेल्या चार दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावांमध्ये, शेतात काम करत असणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेवर, दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मतदार संघात घटना घडल्याने एकचं खळबळ उडाली आहे.

मिरवट गावातील 22 पिडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे वय 40 रा. मिरवट व साजन तिडके वय 30 रा. भोगलवाडी, या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबाबद कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय.

दरम्यान गेल्या चार दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील 24 वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दलित अत्याचाराविरुद्ध मुग गिळून बसणाऱ्या खासदारांनी आम्हाला शिकवू नये-रामदास आठवले

News Desk

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

News Desk

पवार कुंटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत -सुप्रिया सुळे

News Desk