HW News Marathi
महाराष्ट्र

खळबळजनक! बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

बीड | बीड जिल्ह्याला हादरून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने अवघ्या ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यामधील डोंगरपिंपळा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षीय चिमुकलीवर १९ मार्च २०२२ शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) याने घरासमोर खेळत असलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून बळजबरीने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याची धमकी देखील नराधम आरोपीने दिली असल्याचं आता समोर आलं आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत. याप्रकरणी मुलीच्या चुलत्याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) वर्षे रा.डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई याच्या विरोधात कलम 376, 376(2), 376(AB), 506 भादंवि 4, 6 पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी हे करत आहे. सदरील आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून आता या प्रकरणी सखोल तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणूक: बिनविरोध निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी

News Desk

आदित्य ठाकरेसोबत शिवसेनेचे ‘हे’ १० आमदार आज घेणार शपथ

News Desk

ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा -आठवले

News Desk