HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांची हत्या

बीड | एकतर्फी प्रेमातून कोण कधी काय करेल ? हे सांगता येत नाही. असाच धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बीडच्या केजमध्ये उघडकीस आलाय. “तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत का लावून देत नाही ? असं म्हणत ४५ वर्ष व्यक्तीवर भररस्त्यात मुलासह दोन मित्राने हल्ला चढवला. आणि यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांचा उपचारादरम्यान लातूरमध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे तात्काळ आरोपींना अटक करा, ही मागणी घेऊन नातेवाईक आक्रमक झाले असून बीडच्या केज पोलीस ठाण्यात मृतदेह ठेऊन ठिय्या सुरू केले आहे.

रमेश एकनाथ नेहरकर (वय 45 रा. पिसेगाव ता. केज) असे मुलीच्या मयत वडिलांचे नाव आहे. ते केज येथील सानेगुरुजी ऊसतोड कामगार मुलांच्या शाळेत सेवक म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. हे फोटो भागवत चाटे (रा. तांबवा ता. केज) या तरुणाने केल्याचे त्यांना समजले. त्यामुळे रमेश नेहरकर यांनी तु फोटो का व्हायरल केले ? असा जाब विचारला. यावेळी भागवत चाटे याने “तुझ्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून दे” असे म्हणत जर लग्न लावून नाही दिले, तर बघून घेतो अशी धमकीही दिली होती.

यादरम्यान रमेश नेहरकर ९ मार्च रोजी कळंब येथून दुचाकीवरून क्रमांक केजकडे येत होते. यावेळी पाठी मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी रमेश यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला दवाखान्यात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूरला हलविण्यात आले होते. मात्र लातूर येथे उपचारादरम्यान रमेश नेहरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. मात्र आरोपींना तात्काळ अटक करा, ही मागणी घेऊन मृतदेह ठाण्यात ठेवत नातेवाईक आक्रमक झाले असून ठिय्या सुरु केला आहे..यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डीत ड्रेसकोडवरुन वातावरण तापलं, फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई आज शिर्डीत

News Desk

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

News Desk

“जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? EDची नोटीस का आली?” सातारा जिल्हा बँकेने दिली उत्तरे

News Desk