HW News Marathi
महाराष्ट्र

पत्नी राष्ट्रवादीत, आणि स्वता मात्र शिवसेनेत असणाऱ्या पठ्ठ्याला आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आपण जाणून घेऊयात, कोण आहेत मोहसीन शेख? त्यांची याअगोदरची राजकीय पार्श्वभूमी काय? आणि त्यांना युवासेनेकडून इतकी मोठी लॉटरी लागण्यामागे नेमकं काय कारण आहे.

मोहसीन शेख कोण?

मोहसीन शेख शिवसेनेत येण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु काही कारणांनी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदर म्हणजेच 2017 ला राष्ट्रवादीला बायबाय करत शिवसेना भगवा झेंडा खांदयावर घेतला. शिवसेनेत आल्यापासून त्यांनी चांगलं काम केलं. गेल्या 4 वर्षात आपल्या कामाने त्यांनी पक्षनेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही मोहसीन शेख सहभागी होता. तसंच युवासेनेच्या अनेक कार्यक्रमात मोहसीन शेख अग्रक्रमाने पुढे असतो. साहजिक त्याने आपल्या कामाची छाप सोडली आहे.विशेष म्हणजे मोहसीन शेख यांची पत्नी आणखीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मानकूर्द शिवाजीनगरच्या त्या नगरसेविका आहेत. पत्नी राष्ट्रवादीत आणि मोहसीन शेख शिवसेनेत आहेत.

राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. राणे-सेना आंदोलावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला महाशक्ती बनविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली

News Desk

ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही !

swarit

केजरीवाल समोर दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांकडून धक्काबुक्की

swarit