बीड | परळी येथील रेल्वे स्थानकात उभी असलेल्या रेल्वे गाडीत स्फोट झाल्याने स्थानकात खळबळ उडाली आहे. हैद्राबादकडे जाणारी पूर्णा-हैद्राबाद पॅसेंजर गाडी इंजिन बदलण्यासाठी आज (२३ डिसेंबर) सकाळी स्थानकावर थांबलेली असताना एका डब्यात मोठा आवाज झाला. एका प्रवाशाने सुतळी बॉम्ब आपल्या तोंडात पेटवल्याने तो त्याच्या तोंडातच फुटल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
या घटनेत तो प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी परळी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे अक्रम सय्यद असे या १९ वर्षीय युवकाचे नाव असून राहणार पाथरी जिल्हा परभणी येथील आहे. तो त्याच्या माता पितासोबत गावास निघाला होता. या व्यतिरिक्त त्याच्या पॅन्टच्या पॉकेटत आणखी एक सुतळी बाँब मिळाला असून तो रेल्वे पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . मात्र, या सर्व प्रकाराने रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्फोटक पदार्थाना बंदी असतानाही त्या प्रवशाजवळ सुतळी बॉम्ब कसा आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशीच हलगर्जीपणा बाळगण्यात येत असेल तर येणाऱ्या काळात मोठी घटना होण्याची संभावना टाळता येत नाही, अशी चर्चा सध्या परळीत जोर पकडत आहे. अद्याप कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.