HW News Marathi
महाराष्ट्र

माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड!

सांगोला। ११ वेळा माजी आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं काल(३० जुलै) निधन झालं आहे. गणपतराव देशमुख हे आपल्या सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व शेवटपर्यंत करत राहीले. शेकापच्या नेत्यांसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केलीय. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आम्ही आणि मतदारसंघ आज पोरका झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

कोण होते गणपतराव देशमुख?

गणपतराव देशमुख हे सांगोला गावातून निडवणुकीला उभे राहिले होते. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केलं. विशेष म्हणजे २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख राहिली. त्यांचे सध्या वय ९५ होते. सलग अकरा वेळा निवडून विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ नेता

भारतीय जनता पक्षामध्ये सत्तरी पार केलेल्या उमेदवारांना ब्रेक दिला जात होता आणि त्यामुळे अनेक वयस्कर उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागत होती मात्र याला संपूर्ण देशात अपवाद ठरले होते, ते ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख .अनेकांची पक्षांतर होत असताना आबा मात्र पक्षनिष्ठ राहिले.वयाची नव्वदी पार केलेल्या या 94 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजपर्यन्त सांगोला मतदारसंघात पाहायला मिळत मिळालीये.गणपतरावांनी निवडणुकीतून माघार घेऊनही ‘आबासाहेब फिरसे’ असा नारा कार्यकर्तेच नाही, तर प्रत्येक मतदार देत होते. आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला होता .

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात मोठी होती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावलेला होता.

एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा नेता

गणपतराव देशमुख हे त्यांच्या सध्या राहणी साठी देखील ओळखले जायचे. ११ वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना आणखी एक धक्का; सहकार विभागाने राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला

Aprna

अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती!

News Desk

२० मे पर्यंत शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

News Desk