मुंबई | इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात एका शेतात विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान कारवार एव्हिएशनचे (Carver Aviation plane) असून या विमानात एक वैमानिक जखमी झाला असून या वैमानिकाला उपचारासाठी नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कारवार एव्हिएशनच्या वतीने महिला वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. बारामतीत आज (25 जुलै) सकाळी बारामतीतून कारवार एव्हिएशन विमानाने उड्डाण घेतले होते. यानंतर एव्हिएशन विमानाने दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात महिला वैमानिक जखमी झाली आहे.
या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून या घटनास्थळी कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
#Pune : Trainer Aircraft crashed on farm in Kadbanwadi village of Indapur. 22 female trainee pilot Bhavika Rathod sustained lightly injury. #AircraftCrashed pic.twitter.com/TszoKlnx5o
— Sonu Kanojia (@NNsonukanojia) July 25, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.