HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल; शरद पवारवर केलेले ‘ते’ प्रकरण भोवले

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार नितशे राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी राणे बंधूवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.      

राणे बंधूनी हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडतील, असे भाष्य केल्याचे एफआयआरमध्ये नोंद केले आहे. एफआयआरमध्ये म्हटले, नितेश राणेंनी  आझाद मैदानात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल त्यांनी पवारांना केला होता. एखाद्या पदावरील व्यक्तीचा राजीनामा घेणे हे मुख्यमंत्री आणि सरकारचा निर्णय असतो. परंतु, अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला. तर नवाब मलिकांचा मुस्लिम असल्याने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे नितेश राणे म्हणाले. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. 

राणे नेमके काय म्हणाले

निलेश राणे म्हणाले, “मला संशय येतो की, शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरेच मला संशय येतो. ज्यांनी व्यवहार केला. दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसांना पैसे दिले, बॉम्बब्लॉस्ट करणाऱ्या माणसांना पैसे दिले. मग अनिल देशमुखांनी काय केले होते?, कसा झट की पट त्यांचा राजीनामा घेतला होता.  विचार केला होता का? मग नवाब मलिक कोण आहे? ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला. की अशी भीती आहे की नवाब मलिक खरं बोलले, तर शरद पवारांविषयी माहिती बाहेर येईल?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त चिपळूणसाठी तब्बल अडीच हजार पुस्तकांची मराठी भाषा विभागाकडून भेट!

News Desk

CDR मिळवणे हा गुन्हा ! सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

News Desk

पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का?

swarit