HW News Marathi
महाराष्ट्र

‘हिंदुस्थानी भाऊ’च्या पोलीस कोठडीत आणखी एक दिवसाची कोठडी वाढ

मुंबई |  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकविल्याप्रकरणी न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊच्या एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊची आज (४ फेब्रुवारी) पोलीस कोठडी संपली होती. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर करण्यात आले.  संपतेय. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी भाऊला पोलीस वांद्रे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. या मुद्द्यांवरून हिंदुस्थानी भाऊने त्यांच्या सोशल मीडियावर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करणार व्हिडिओ डाकला असून या व्हिडिओमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावीच्या घराबाहेर जमा होण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी धारावीमध्ये वर्षा गायकवाडच्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलनने आक्रमक रुप घेतले होते. विद्यार्थ्यांवर नियमंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली. 

हिंदुस्थानी भाऊने २४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे, तर मग परीक्षा ऑफलाईन का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, अशी विनंती देखील भाऊने सरकारला केली आहे.

या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने आपल्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या, अशी मागणी त्याने केली आहे. परीक्षा घेऊच नका, असं मी म्हणत नाही. मात्र, कोरोना महामारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अथवा ऑनलाईन घ्याव्या, असे त्याने सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी माझ्या संपर्कात असून अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही तर त्यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद देत राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक जगदिश कदम यांना दर्पण पुरस्कार जाहीर

News Desk

मला काय मिळेल याची मला चिंता नाही, दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार! – पंकजा मुंडे

Aprna

जाणून घ्या…मतदानाला जाताना कोणती ओळखपत्र सोबत घ्यावी

News Desk